वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

काळावरी सत्ता । ऐशा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077263 · अभंग क्र. २८८७

2887.
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
तो मी हीना हूनि सांडे । देवे दुऱ्हे काळतोंडे ॥धृपद॥
मानूनी भरवसा । होतो दासा मी ऐसा ॥२॥
तुका म्हणे मान । गेलो वाढवू थोरपण ॥३॥

अर्थ :
माझी काळावर सत्ता आहे अशा गप्पा मी मारत होतो. परंतू मी तर हीनाहूनही हीन आहे देव माझ्यापासून अंतरल्यामुळे मी काळतोंडा झालो आहे. मी असा भरवसा धरला होता की माझी काळावर सत्ता आहे आणि मी विठ्ठलाचा दास आहे असे देखील गर्वाने म्हणत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांमध्ये माझा मान सन्मान वाढवायला गेलो माझा मोठेपणा वाढवायला गेलो परंतू मी माझेच नुकसान करुन घेतले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग