दुबार बाहुली वस्तुरू
2883.
दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहता सोहं मेळी चिदांनंद ॥१॥
अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथे ॥२॥
सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगातिनी । निश्चिती ते नयनी बिंदुरूप ॥३॥
एका जनार्दनी पाहे डोळियां भीतरी । सबाह्म अभ्यंतरीं तरीच दिसे ॥४॥
