वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आवडी धरूनि करू गेलो

🙏 3. संत तुकाराम · ABH-077258 · अभंग क्र. २८६३

2863.
आवडी धरूनि करू गेलो लाड । भक्तिप्रेमकोड न पुरेचि ॥१॥
म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनी बहुसाल ॥धृपद॥
वेठीऐसे वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलो ॥२॥
तुका म्हणे सरते नव्हेचि पायापे । बळ केले पापे नव्हे भेटी ॥३॥

अर्थ :
देवा तुझी आवड धरुन तुझे लाड करण्यासाठी गेलो तर माझ्या भक्तीप्रेमाची इच्छाच पूर्ण होत नाही. म्हणूनच माझा जीव व्याकूळ होऊन मनात खूप खेद होत आहे. देवा मी आतापर्यंत तुमच जी भक्ती केली ती सर्व वेठबिगारीप्रमाणे ठरली म्हणजे निष्फळच ठरली त्यामुळे मी आता लाकडाच्या खोडाप्रमाणे शांत उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्या पायाशी मान्य झालो नाही कारण माझ्या पापाचे फळ फारच वाढले आहे त्यामुळेच तुमच्या पायाची भेट मला होत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग