वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

करावा वर्षाव । तृषाक

🙏 3. संत तुकाराम · ABH-077223 · अभंग क्र. २८९२

2892.
करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥१॥
पाहे आकाशाची वास । जाणता तू जगदिश ॥धृपद॥
संयोगे विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥
तुका म्हणे फळे । चरणांबुजे ते सकळ ॥३॥

अर्थ :
देवा तुमच्या कृपेचा तुमच्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर करा कारण माझा जीव फार तृष्णांकित झाला आहे. देवा तू आकाशाचेच स्वरुप आहेस त्यामुळे मी आकाशाकडे आशा देऊन पाहात आहे. मोठया आशेने आकाशाकडे पाहात आहे. हे जगदीशा तू सर्व काही जाणतो आहेस. हे जगदीशा तुझ्या कृपाजलाचा जर संयोग झाला तर माझ्या अंत:करणातील ज्ञानांकुराचा वाढ होऊ लागतो आणि ते विस्तार पावु लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे चरण म्हणजे माझ्यासाठी सर्व प्रकारचे फळच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग