वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

देवे दिला देह भजना ग

🙏 3. संत तुकाराम · ABH-077220 · अभंग क्र. २८७२

2872.
देवे दिला देह भजना गोमटा । तो या झाला फाटा बाधिकेचा ॥१॥
ताठोनिया मान राहिली वरती । अहंकारा हाती लवो नेदी ॥धृपद॥
दास म्हणावया न वळे रसना । सइर वचना बा सगळे ॥२॥
तुका म्हणे कोठे ठेवावा विटाळ । स्नाने नीर्मळ व्हावयासी ॥३॥

अर्थ :
देवाने हा गोमटा म्हणजे उत्तम देह हरीभजन करण्याकरता दिला परंतू संसाराच्या आडरान फाटयामध्येच हा देह गुंतून राहिला. हा देह अहंकाराच्या हातात सापडलेला आहे त्यामुळे मनुष्याची मान सारखी ताठच असते नेहमी वरती असते ती मान कोणाच्याही पुढे लवत देखील नाही. हरीचा दास म्हणून घेण्यासाठी याची जीभ कधीही वळत नाही परंतू स्वैर वचन बोलण्याकरता याचा गळा नेहमी वासलेलाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देह म्हणजे एक प्रकारचा विटाळच आहे त्यासाठी कितीही निर्मळ होण्यासाठी स्नान केले तरी काही उपयोग होणार नाही जर या देहाने हरीचे भजन केले नाही संत सज्जन ज्येष्ठांपुढे आपली मान लवविली नाही तर या देहाचा काहीही उपयोग नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग