वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जडलो तो आता पायी । ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-077309 · अभंग क्र. २८८६

2886.
जडलो तो आता पायी । होऊ काई वेगळा ॥१॥
तुम्ही संती कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥धृपद॥
सांभाळिलो मायबापा । केलो तापावेगळा ॥२॥
वोरसे या जीव धाला । तुका ठेला मौन्यचि ॥३॥

अर्थ :
हे संतजनहो मी आता तुमच्या पायाशी जडलो गेलो आहे आता मग त्यापासून मी वेगळा होईल काय ? गंगेचा ओघ ज्याप्रमाणे रस्त्यातील सर्व लोकांचे पाप धुवून टाकते सर्व वृक्षांना सर्वांनाच तृप्त करते त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझ्यावर कृपा केली आहे. हे मायबापानो तुम्ही माझा सांभाळ केला आणि मला त्रिविधतापापासून वेगळे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजनहो तुमच्या कृपा आर्शिवादाने तुमच्या प्रेमाने माझा जीव तृप्त झाला आहे त्यामुळे अधिक काय बोलावे त्यामुळेच मी मौन धारण केले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग