आवडीवी न पुरे धणी ।
2885.
आवडीवी न पुरे धणी । प्रीत मनी बैसली ॥१॥
नित्य नवा कळवळा । मायबाळामध्ये तो ॥धृपद॥
सुख सुखा भेटो आले । होय वाल्हे पोटींचे ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हानंदे । संतवृंदे चरणापे ॥३॥
अर्थ :
संतांच्याविषयी इतकी आवड माझ्या मनात बसली आहे की ती कधीही तृप्त होतच नाही. मायबाळामध्ये जसा नित्य नवा कळवळा आहे अगदी तसाच आमच्यामध्ये आहे. आई आणि मुलाची भेट जर घडली तर ती भेट नाही तर सुखच जणू सुखाला भेटायला आले आहे असे वाटते इतके ते घट्ट प्रेम असते. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे ब्रम्हानंदाचे स्वरुप असतात त्यामुळे त्यांच्या चरणाचीच आवड धरावी.
