वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

झाले आता साठे । कासय

🙏 3. संत तुकाराम · ABH-077291 · अभंग क्र. २८६८

2868.
झाले आता साठे । कासयाचे लहान मोठे ॥१॥
एक एका पडिलो हाती । झाली तेव्हांची निश्चिंती ॥धृपद॥
नाही फिरो येत मागे । झाले साक्षीचिया अंगे ॥२॥
तुका म्हणे देवा । आता येथे नाही हेवा ॥३॥

अर्थ :
देवा आम्ही आमचा देहभाव तुला अर्पण केला आहे आणि त्याच्या बदल्यात तुझे नीजस्वरुप आम्हाला प्राप्त झाले आहे मग आपल्यामध्ये कसला आता लहान मोठा फरक राहिला आहे ? अहो देवा ज्यावेळी आपण एकमेकाच्या हाती आलो म्हणजे आपण दोघे एकरुप झालो तेव्हाच माझी निश्चिंती झाली. देवा आता तुझ्या या नीजस्वरुपामधून आम्हाला मागे फिरता येणार नाही कारण साक्षी ठेवूनच आपण एकरुप झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा आता मी तुझ्या नीजस्वरुपामध्ये एकरुप झालो आहे त्यामुळे आता येथे कोणाविषयी हेवा ठेवावा ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग