आयुष्य भविष्य हे तंव
2905.
आयुष्य भविष्य हे तंव कवणा हाती । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥
आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळी सांभळीत ॥२॥
गुंतुनीं संसारी पडती अघोरी । न चुकेची फेरी येता जाता ॥३॥
एका जनार्दनी संतकृपेंविण । कोण वारी शीण जन्मामृत्यु ॥४॥
