वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आवडी न पुरे मायबापाप

🙏 3. संत तुकाराम · ABH-077227 · अभंग क्र. २८६७

2867.
आवडी न पुरे मायबापापासी । घडो का येविसी सकईल ॥१॥
होईल नेमले आपुलिया काळे । आलीयाचे बळे आग्रहो उरे ॥धृपद॥
जाणविले तेथे थोडे एक वेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमी ॥२॥
तुका म्हणे निवेदिले गुह्य गुज । आता तुझी तुज सकळ चिंत्ता ॥३॥

अर्थ :
आई बाबापुढे मुलाची आवड पूर्ण होणार नाही असे घडू तरी शकेल काय ? जे ज्यावेळी होणार आहे ते त्यावेळीच होणार आहे आणि जर कोणत्याही कार्‍याला बळजबरीने आग्रह केला तर मात्र त्याचा केवळ आग्रहच शिल्लक राहात असतो. मी माझी आवड अगदी थोडया वेळातच देवाला सांगितली आहे आणि तो माझी आवड नक्कीच पूर्ण करील कारण माझा देव सर्वकाळ सर्वोत्तम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या जवळ सर्व गुह्यगोष्टी निवेदन केल्या आहेत आता त्यासंबंधी सर्व चिंता तुझी तुलाच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग