जीव शिव दोन्ही एकचि
2867.
जीव शिव दोन्ही एकचि आसनी । पूजी अवसानी सर्वकाळ ॥१॥
कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥
परद्रव्य परस्त्री येथे आसक्त नोहे मन । तेणे जनार्दन पूजा पावे ॥३॥
एका जनार्दनी ममता टाकुनी । संतांचे चरणी पूजन करी ॥४॥
