वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

विषम वाटे दुरवरी । च

🙏 3. संत तुकाराम · ABH-077239 · अभंग क्र. २९०५

2905.
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाही उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हाती गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥धृपद॥
होता पहिला अभ्यास । समयी घालावया कास । तेव्हा लटिके दोष । योगे अनुतापाच्या ॥२॥
तुका म्हणे आहे । बुद्धी केलियाने साहे । जवळीच पाहे । देव वाट स्मरणाची ॥३॥

अर्थ :
लोकहो तुम्ही भेदबुध्दीच्या वाटेने चालत जाऊन जाऊन खूप दूरवर अनेक योनीमध्ये पोहोचला आहात परंतू आता तरी या मनुष्य देहामध्ये पुन्हा देवाकडे माघारी फिरा. मग तुम्हाला मागे जे दु:ख झाले त्याचे भय पुढे उरणारच नाही. मुख्य म्हणजे भेदबुध्दीचा नाड येऊ नये जर असे झाले तर आपल्या हाती शेवट गोड येणार आहे. एकदा की इच्छा नाहीसा झाल्या मग कसले दु:ख राहाते ? पहिले तुम्हाला संसारामध्ये कंबर कसून जो अभ्यास होता फक्त आता वेळप्रसंग पाहून तसाच अभ्यास आपली कंबर कसून परमार्थामध्ये करावा. एकदा की तुला पश्चात्ताप झाला की त्या योगाने सर्व पूर्वीचे दोष खोटे होतील. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामध्ये आपली बुध्दी शुध्द करावी व देवाला अनुकूल करुन घ्यावे मग पाहा देव तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. देव तुमच्या नामस्मरणाचीच वाट पाहात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग