वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

हारपोनि गेली निशी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077143 · अभंग क्र. २८९६

2896.
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखो ॥१॥
नारायणी वसले घर । निरंतर आनंद ॥धृपद॥
अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझे ॥२॥
तुका म्हणे एके ठावी । असू नाही क्षणभिन्न ॥३॥

अर्थ :
हरीच्या छंदामध्ये माझी रात्र सुध्दा हरवून गेली आहे आणि झोप कशी असते ते देखील मला दिसत नाही. नारायणाच्या ठिकाणीच आमचे घर वसले आहे तेथे निरंतर आनंदच आहे. नारायणाने सर्व जागा व्याप्त करुन टाकले आहे सर्वत्र नारायणच आहे असेच मला दिसत आहे आणि नारायणाने माझ्या ठिकाणाहून मी आणि माझे हा भेदभावच नेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता एका नारायणाच्याच ठिकाणी वास्तव्य करु त्यापासून एक क्षणभर देखील वेगळे आम्ही राहणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग