काय उरली ते करू विनव
2862.
काय उरली ते करू विनवणी । वेचलो वचनी पांडुरंगा ॥१॥
अव्हेरलो आता कैचे नामरूप । आदर निरोप तरि तो नाही ॥धृपद॥
माझा मायबाप ये गेलो सलगी । तो हे तुम्हा जगी सोयरिका ॥२॥
तुका म्हणे आता जोडोनिया हात । करी दंडवत ठायिंचा ठायी ॥३॥
अर्थ :
हे पाडूरंगा आता काय विनंती करण्याची उरली आहे तुला विनंती करण्यासाठी मी पुष्कळ वचन देखील खर्च केले आहे. देवा अरे तू माझा कधी स्वीकार केला नाही नेहमी माझा अव्हेर केला माझा आदर तर कधीही केला नाही साधा माझा एक निरोप देखील कधी पाठवला नाही मग तुला नामरुप आहे हे आम्ही कसे जाणून घ्यावे ? अहो देवा तुम्ही मायबाप आहात असे मी समजतो त्यामुळे तुझ्याशी सलगी करु गेलो तर तुला तर सारे जग सोयरीक आहे त्याच्यामुळे तू आमच्याकडे लक्ष तरी का देशील ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी माझे दोन्ही हात जोडून तुला जागोजागी दंडवत करीत आहे.
