वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

अद्वय चिद्वय झालेचि

🙏 3. संत तुकाराम · ABH-077246 · अभंग क्र. २९०९

2909.
अद्वय चिद्वय झालेचि कारण । धरिले नारायणे भक्तिसुख ॥१॥
अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाही ॥धृपद॥
शून्य निरसुनी राहिले निर्मळ । ते दिसे केवळ विटेवरी ॥२॥
सुखे घ्यावे नाम वदनाही वाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥
तुका म्हणे मीच आहे तेणे सुखे । भेद नाही मुखे नाम गाता ॥४॥

अर्थ :
नारायण हा पूर्वी अव्दैत स्थितीत होता आता परंतू तो व्दैत स्थितीत आला आहे याला मुख्य कारण म्हणजे भक्तीसुखाची आवड त्याने धरली आहे. हा नारायण जरी चतुर्भूज झाला आहे सगुण आकाराला आला आहे तरी देखील त्याचे जे एकतत्व बीज आहे त्यापासून तो भिन्न नाही. सर्व शून्याचा निराश करुन जे निर्मळ स्वरुप आहे तेच केवळ विटेवर आपल्याला प्रत्यक्ष रुपाने दिसत आहे. नारायणाचे नाम सुखाने घ्यावे याचीच आवड माझ्या मुखाला आहे आणि नदी आड विहीर यांच्यामधे जसे पाणी एकच असते त्याप्रमाणे सगुण असो किंवा निर्गुण असो त्यामध्ये एकनारायणच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हेच वर्म मी जाणून घेतले त्यामुळे मी सुखी झालो आहे आणि नारायणाचे नाम मी माझ्या मुखाने गात असताना नारायणाचा सगुण किंवा निर्गुण स्वरुपाचा भेदच माझ्या ठिकाणी राहिला नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग