वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

येती नरदेहा गमाविती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085024 · अभंग क्र. २९०९

2909.
येती नरदेहा गमाविती आयुष्य । प्रथम बाळदशेस । भोगिताती ॥१॥
वाचा नाही तया रडे आक्रंदोनी । जननीं तो स्तंनीं लावी बळे ॥२॥
क्षुधा लागलीया औषध पाजिती । उदर दुखतां देती स्तन बळे ॥३॥
संपता द्वादशा जालासे शहाणा । करुनी अंगना वेगी देती ॥४॥
विषयाचे बळे मातलासे सर्व । सदा धुस् दर्प अंगी वसे ॥५॥
सरलीया तारुण्य आला वृद्ध दशे । भोगितसे क्लेश नाना व्याधी ॥६॥
रामनाम वाचे सदा आठवणी नाही । धन दारा पुत्र पाही माझे माझे ॥७॥
शेवटील घडी परिपुर्ण भरली । माती जड झाली पापिष्ठाची ॥८॥
येउनी यमदूत नेताती बांधुन । नानापरी ताडन करिताती ॥९॥
यातना ती सर्व भोगुनी ढकलिती । पुनरपि येती गर्भवासा ॥१०॥
चौर्‍यांयशी लक्षा योनी फिरतां फिरतां । एका जनार्दनी तत्त्वता नरदेह ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग