निरोधती परि न मोडे व
2908.
निरोधती परि न मोडे विकार । बहु ही दुस्तर विषयद्वारे ॥१॥
राहातेति तुम्ही भरोनि अंतरी । होतो तदाकारी निर्विषयची ॥धृपद॥
कृपेचिया साक्षी असती जवळी । वचने मोकळी सरत नाही ॥२॥
तुका म्हणे ताळा मेळवणीपाशी । विनंती पायाशी हेचि करी ॥३॥
अर्थ :
मी मनाला फार विरोध करतो परंतू काम क्रोधादी विकार काही केल्या मोडलेच जात नाही आणि विषय ज्या माध्यमातून घुसतात ते इंद्रियरुपी व्दार अडवणेही फारच कठीण आहे. देवा तुम्ही जर माझ्या अंत:करणात भरुन असतात तर मी निर्विषय होऊन तदाकार झालो असतो. देवा तुमच्या कृपेचा जर अनुभव माझ्याकडे असता तर मी काहीही बोलणे हे योग्य ठरले असते परंतू तुमच्या कृपेचा अनुभवच माझ्याजवळ नाही आणि नुसतेच कोरडे बोलून ते काही उपयोगाचे ठरणार आहे काय तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कोणताही व्यापार जर केला तर त्याचा ताळमेळ बसवावा लागतोच नाही तर तो व्यापार देखील सफल ठरत नाही त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या व आमच्या मनाचा ताळमेळ बसवा हीच मी विनंती तुमच्या पायाजवळ बोलतो आहे.
