कोटी कोटी फेरे घेऊनि
2899.
कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया ॥१॥
कोण तुज सोडी कोण तुज सोडी । पडेल जेव्हा बेडी पायी रया ॥२॥
हाणिती मारिती निष्ठुर ते दूत । विचकुनियां दांत पडसी रया ॥३॥
एका जनार्दनी मागील आठव । कांही तरी भेव धरी रया ॥४॥
