गुणाचाचि साठा । करू
2877.
गुणाचाचि साठा । करू न वजो आणिका वाटा ॥१॥
करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥धृपद॥
नेमली पंगती । आम्हा संतांची संगती ॥२॥
तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहो डोळा ॥३॥
अर्थ :
आम्ही चांगल्या गुणाचाच साठा करुन ठेवू इतर कोणत्याही वाटेला आम्ही जाणार नाही. नाना प्रकारच्या विषयांच्या आडरानामध्ये अनेक लोकच जातात अनेक प्रकारचे छंद जोपासतात आणि त्यामुळे अडचणी येतात व दु:खी होतात. आम्ही संतांची पंगत निवडून त्यांची संगती नेहमी निवडली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या जगाचे कौतुक सगळयापेक्षा अलिप्त राहून आमच्या डोळयाने लीला पाहू.
