चार मुद्रा आणि समाधी
2881.
चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हे ॥१॥
चहू समाधीचें पाही हे देखणे । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥
जिकडे पाहता तिकडे स्वरूपचि दिसे । तयामाजी ठसे आणिक बिंब ॥३॥
मसूरप्रमाण शून्य महा ते कारण । गुरुमुखें खूण जाणावी पै ॥४॥
साचार स्वरूपाची मेळवणी केली । परात्पर ठेली हेंचि ज्योती ॥५॥
त्याच वस्तूसाठीं भांडती पुराणे । वेद शास्त्रें येथे मौनावलीं ॥६॥
गुह्मा हे पंचक देखोनी समाधी । बोलोनिया वेदीं निश्चयो केला ॥७॥
एका जनार्दनी स्वरूप उरले पाही । द्वैत गेले पायी सद्गुरूच्या ॥८॥
