वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

मारू नये सर्प संतांच

🙏 3. संत तुकाराम · ABH-076995 · अभंग क्र. २९०४

2904.
मारू नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणे ॥१॥
एक सूत्र जीवशिवी आइक्यता । रोम उपडिता अंग कापे ॥धृपद॥
नाही साहो येत दुखाची ते जाती । परपीडा भूती साम्य झाली ॥२॥
तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नावे चित्त सुखी तेणे ॥३॥

अर्थ :
संतांच्या समोर सर्पाला देखील मारु नये कारण सर्वत्र हरी व्यापक आहे अशी त्यांची भावना आहे व सर्पाला मारले तर ते कष्टी होतात दु:खी होतात. जसे एका माळेत अनेक मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे संतांच्या दृष्टीने जीव आणि शिव हे दोन्हीही एकरुप आहेत त्यामुळे ते सर्वत्र ब्रम्ह पाहत असतात आणि जर कोणाच्या अंगावरील एक केस जरी त्यांच्यासमोर (संतांच्या) उपटला तरी त्यांचे अंग कापते. संतांची जातच इतकी दयाळू आहे की त्यांना कुणाचेही दु:ख सहन होत नाही परपीडा झालेली तर त्यांना मुळीच सहन होत नाही कारण त्यांच्या दृष्टीने सर्व भूतमात्रांमध्ये साम्यताच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदाने एक नीतीचा संकेत सांगितला आहे तो म्हणजे सर्व भूती एक ईश्वर आहे व कोणत्याही भूतमात्राचा मत्सर मनुष्याने करु नये याचेच नांव म्हणजे ईश्वराची पूजा आहे व असे केल्याने आपले चित्त सुखी होत असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग