वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

अभयदान मज देई वो दात

🙏 3. संत तुकाराम · ABH-076977 · अभंग क्र. २८९१

2891.
अभयदान मज देई वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥
देहभाव तुझ्या ठेवियेला पायी । आणीक मी काही दुजे नेणे ॥धृपद॥
सेवाभक्तिहीन नेणता पतित । आता माझे हित तुझ्या पायी ॥२॥
तुका म्हणे तुझे नाम दिनानाथ । ते मज उचित करी आता ॥३॥

अर्थ :
हे दातारा कृपेच्या सागरा मायबापा तू मला अभयदान दयावे. देवा मी माझा देहभावच तुझ्या पायी ठेवलेला आहे याशिवाय मी दुसरे काहीही जाणत नाही. देवा मी सेवाहीन व भक्तीहीन आहे अज्ञानी आहे पतित आहे आता माझे सर्व हित तुझ्या पायाजवळच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे नाम दीनानाथ आहे त्यामुळे माझ्या दीनाचा तू नाथ हो आणि माझा उध्दार कर व तुझ्या नामाला तू सार्थ कर.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग