हेंही ऐसे तेही ऐसे ।
2870.
हेंही ऐसे तेही ऐसे । उभय पिसे अविचार ॥१॥
अभिमानाचे ठेलाठेली । मधी झाली हिंपुष्टी ॥धृपद॥
धीरा शांती ठाव नुरे । हाचि उरे आबाळ्या ॥२॥
कौतुक हे पाहे तुका । कढता लोका अधणी ॥३॥
अर्थ :
हि माणसेही अशीच आणि ते पशूही तसेच दोघेही वेडे अविचारी आहेत. दोघाच्याही ठिकाणी देहाविषयी अभिमान आहे त्यामुळे अभिमानाच्या धक्काबुक्कीमध्ये दोघेही कष्टी झाले आहेत. धैर्य आणि शांती या दोघाच्याही ठिकाणी तर कोठेही उरलीच नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळे कष्ट होऊ नये एवढेच मात्र उरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व लोक त्रिविधतापाच्या आंदनीमध्ये कढत आहे आणि हे कौतुक मी पाहात आहे.
