मिथ्या मायेच्या धाका
2876.
मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटी ॥१॥
आसन घालूनिया जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥
क्षुधेने खादली भूक । तृषा तहान प्याली देख ॥३॥
बुद्धी सुबुद्धि धरूनि हाती । आकळितसे इंद्रियवृत्ती ॥४॥
शांतीचेनि बळे । संकल्प त्यागिले सकळ ॥५॥
ऐशी योगाची कहाणी । शरण एका जनार्दनी ॥६॥
