फुले झडे तंव फळ सोसे
2893.
फुले झडे तंव फळ सोसे । तया पाठी तेंहीं नासे ॥१॥
एक मागे एक पुढे । मरण विसरले बापुडे ॥२॥
शेजारीं निमाले कोणाचे खांदी । लपों गेला सापें खादली मांदी ॥३॥
मरण ऐकता परता पळे । पळे तोही मसणीं जळे ॥४॥
प्रेत देखोनी वोझाच्या जाती । वोझे म्हणती तेही मरती ॥५॥
मरण म्हणता थूं थूं म्हणती । थुंकते तोंडे मसणीं जळती ॥६॥
पळेना चळे तोचि सांपडें । जाणता होताती वेडे ॥७॥
एका जनार्दनी शरण । काळवेळ तेथे रिगे मरण ॥८॥
