वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

धन्य तो ग्राम जेथे ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-077106 · अभंग क्र. २९०२

2902.
धन्य तो ग्राम जेथे हरीचेदास । धन्य तोचि वंश भक्ति भाग्य ॥१॥
ब्रम्हज्ञान तेथे असे घरोघरी । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥धृपद॥
नाही पापा रिघ काळाचे खंडन । हरीनामकीर्त्तन घरोघरी ॥२॥
तुका म्हणे तिही तारिले सकळा । आपुल्या कोटिकुळासहित पै ॥३॥

अर्थ :
ज्या गावामध्ये हरीचे दास आहेत ते गांव धन्य आहे आणि ज्या वंशामध्ये हरीचे भक्त जन्माला आले आहेत ते वंश भाग्यवान आहेत. ज्या गावामध्ये हरीभक्त आणि ज्या वंशामध्ये हरीदास आहेत तेथे घरोघरी ब्रम्हज्ञान असते तेथील नरनारी भगवान विष्णूप्रमाणे चतुर्भूज असतात त्यामुळे ते देखील धन्य असतात. जेथे घरोघरी हरीनाम संकीर्तन चालू असते तेथे पापाला थाराच नसतो आणि काळाचे खंडन तेथे होत असते काळाला देखील तेथे प्रवेश मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा हरीभक्तांनी आपल्या कोटीकुळासहीत सर्वांना तारलेले असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग