वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

भय होते आम्हीपणे । प

🙏 3. संत तुकाराम · ABH-077433 · अभंग क्र. २९०३

2903.
भय होते आम्हीपणे । पाठी येणे घातले ॥१॥
अवघा आपुलाचि देश । काळा लेश उरेचि ना ॥धृपद॥
समर्थाचे नाम घेता । मग चिंता काशाची ॥२॥
तुका म्हणे नारायणे । केले जिणे सुखाचे ॥३॥

अर्थ :
आम्हाला देहाभिमानामुळे जन्ममरणाचे खूप भय होते परंतू देवानेच आम्हाला पाठीशी घातले व आमचे भय नाहीसे केले. आता सर्व देश आपलाच आहे काळाला कोठे जागाच उरली नाही. समर्थाचे नाम घेतले की मग कशाची चिंता आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, माझे जीणे म्हणजेच जगणे नारायणाने सुखाचे केले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग