वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

स्वाहिताकारणें विचार

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084821 · अभंग क्र. २८८४

2884.
स्वाहिताकारणें विचार न कळे । संध्येंचें हे मुळ आम्ही जाणो ॥१॥
अर्ध बिंबीं सूर्य धरूं माध्यान्हासी । अस्तु जाता त्यासी अर्घ्य देतो ॥२॥
नासिकेचें अग्र सुषुम्ना विंदान । करी प्राणायाम वेगळाची ॥३॥
साहीं चक्र जप वर्णदळीं संकल्प । पूजा तर्पणयुक्त मंत्र सहज ॥४॥
त्रिपुटीपासोनि डोळिया वंदन । रक्त श्वेत गुण पीत भासे ॥५॥
आर्धाकीं पाहे अणुरेणु सरी । गगन शून्याकारी विखुरलें ॥६॥
विराजली संध्या बैसली जे बाळा । चंद्र सूर्य कळा लाजविल्या ॥७॥
हृदयापासोनी नाबेहेचा नेट । मनी बळकट पुष्टी व्हावी ॥८॥
मूळबंधापासूनि दिधली आटणी । हृदयी कुंडलिनी सिद्ध संघ ॥९॥
दाही दिशा करी प्रदक्षिणा वेडा । गगनी बीज सडा माजिविलें ॥१०॥
एका जनार्दनी संध्या हेंचि रीती । सहस्त्रदळीं ज्योति निजबिंदु ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग