ऐसे वेरझारी कोटी कोट
2900.
ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥
माझे माझे म्हणोनि झोंबतसे बळे । केलेंसे वाटोळे नरदेहा ॥२॥
फजितीचा जन्म मरावे जन्मावें । हे किती सांगावे मूढ जना ॥३॥
एका जनार्दनी माझे माहे टाकुनीं । वैष्णव कीर्तनी नाचे सुखें ॥४॥
