गर्भवासीचें दुःख सां
2895.
गर्भवासीचें दुःख सांगता आटक । मलमुत्र दाथरी जननीं जठरी अधोमुख ॥१॥
शिव शिव सोहं सोहं । कोहं कोहं सांडुई पाहे निज जीवन ॥२॥
गर्भवासीचे सांकडे सांगावे कवणापुढे । सर्वांगी विष्टालेपु नाकीं तोंडीं किडे ॥३॥
एका जनार्दनी भेटी तै जन्ममरणा तुटी । जननी पयपान पुढती न करणे गोष्टी ॥४॥
