प्राणपानांची मिळणी ।
2877.
प्राणपानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी ॥१॥
ती आधारशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घाट ॥२॥
कुंडलिनी चालता वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या हाटा ॥३॥
साधितां उल्हाट शक्ति उलटे । उघडले ब्रह्मारंध्राचें कपाट ॥४॥
शरीराकारें ते बोलिली । एका जनार्दनी पुतळी ॥५॥
