हृदयींचे देव हृदयींच
2871.
हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥
ह्रुदयींच ध्यान हृदयी जे मन । हृदयी ते आसन देव वसे ॥२॥
ह्रुदयीं ते भुक्ति ह्रुदयीं ते मुक्ति । हृदयी सर्वस्थिती देव जाणो ॥३॥
एका जनार्दनी हृदयींच पाहाल । ते सुख घ्याल हृदयामाजीं ॥४॥
