वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

संतसंगती न करावा वास

🙏 3. संत तुकाराम · ABH-077272 · अभंग क्र. २६१३

2613.
संतसंगती न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥
मग तया दोषा नाही परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरी धरून राहे रूप ॥३॥

अर्थ :
संतांच्या संगतीत किंवा संतांच्या बरोबर अगदी जवळ वास करु नये कारण त्यांच्या अंगीचा एखादा गुण दोष असेल तर आपल्या अंगी येऊ शकतो त्यांच्या संगतीमध्ये जर एखादा गुण दोष अंगी जडलाच तर त्याचा परिहार होत नाही याउलट आपल्याजवळ जो पुण्याचा साठा असतो त्याचाच अपहार म्हणजे नाश होतो. तुकाराम महाराज म्हणतात, संतांना दुरुन नमस्कार करावा व त्यांचे रुप आपल्या ह्दयामध्ये धरुन राहावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग