अंगा लावुनियां राख ।
2656.
अंगा लावुनियां राख । करी भलतेंची पाप ॥१॥
मेळवी शिष्यांचा मेळा । अवघा भांगेचा घोंटाळा ॥२॥
नानापरी सांगे मंत्र । नेणे विधीं अपवित्र ॥३॥
न कळे ज्ञानाची हातवटी । सदां परदार राहाटी ॥४॥
एका जनार्दनी सोंग । तेथे नाही पांडुरंग ॥५॥
