वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

म्हणविता हरी न म्हणे

🙏 3. संत तुकाराम · ABH-076957 · अभंग क्र. २६२६

2626.
म्हणविता हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
आयुष्यधन त्याचे नेले यमदूती । भुलविला निश्चिंती कामरंगे ॥धृपद॥
नावडे ती कथा देऊळासी जाता । प्रियधनसुता लक्ष तेथे ॥२॥
कोण नेतो तया घटिका दिवसा एका । का रे म्हणे तुका नागविसी ॥३॥

अर्थ :
एखादया मनुष्याला हरी हरी म्हण असे सांगितले तरीही तो म्हणत नसला तर त्याच्या अंत:करणात काम क्रोधादी विकारांचा दरोडा पडला आहे असे समजावे. ज्याला कामवासनेने निश्चिंत भुलविले आहे त्याचे आयुष्य आणि धन हे दोन्ही यमाचे दूत नेतात असे समजावे. अश्या मनुष्याला कथा आवडत नाही देवळात जाऊन देवाचे दर्शन घेणे आवडत नाही कारण त्याचे सर्व लक्ष त्याच्या पत्नी धन आणि मुलाकडे लागलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू जर एक दिवस एक घटका हरीकथा ऐकली तर त्यावेळेला कोणी तुझ्या पत्नीला धनाला मुलांना नेणार आहे काय मग तू हरीकथा न ऐकून स्वत:ला का नागवितोस ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग