वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 92. तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४

केले तुवा काय जाऊनिय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084544 · अभंग क्र. २६४४

2644.
केले तुवा काय जाऊनिया तीर्था । सर्वदा विषयार्था भुललासी ॥१॥
मनींची ती पापें नाही धोवियेली । वृत्ति हे लाविली संसारींच ॥२॥
तीर्थस्नानें अंग तरी शुद्ध केले । नाही धोवियेलें अंतरासी ॥३॥
वरी दिससी शुद्ध अंतरी मलीन । तोवरीं हे स्नान व्यर्थ होय ॥४॥
तीर्थयात्रायोगें कीर्तिही पावली । बुद्धि शुद्धि झाली नाही तेणे ॥५॥
शांति क्षमा दया नाही पै अंतरी । वाया येरझारी कष्ट केले ॥६॥
एका जनार्दनी सद्‌गुरु पाय धरी । शांतीचे जिव्हारीं पावशील ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग