जीवाचे जीवन जनी जनार
2641.
जीवाचे जीवन जनी जनार्दन 2641
जीवाचे जीवन जनी जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देही ॥१॥
वाउगी का वाया शिणती बापुडीं । काय तया जोडी हाती लागे ॥२॥
पंचाग्रि साधन अथवा धूम्रपान । तेणे काय संपूर्ण हरी जोडे ॥३॥
एका जनार्दनी वाउगीं ती तपें । मनाच्या संकल्पें हरी जोडे ॥४॥
