वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

बैसोनिया खाऊ जोडी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077169 · अभंग क्र. २६३३

2633.
बैसोनिया खाऊ जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥
ऐसे केले नारायणे । बरवे जिणे सुखाचे ॥धृपद॥
घरीच्या घरी भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥
तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥

अर्थ :
नारायणाने जो प्रेमरुपी खाऊचा लाभ करुन दिला तोच एकातात बसून सेवन करु. अशा प्रकारचे माझे सुखाचे जीवन नारायणानेच केले हे फार चांगले केले. सर्व प्रेमरुपी लाभाचे भांडवल घरच्या घरीच मिळाले असून बाहेर कोठे शब्दच खर्च करावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचासाठी आटाआटी करणे आणि त्याच्यासाठी जे भरपूर कष्ट करावे लागतात ते सर्व चुकले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग