वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

दिला जीवभाव । तेव्हा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077157 · अभंग क्र. २६३८

2638.
दिला जीवभाव । तेव्हा सांडिला म्या ठाव ॥१॥
आता वर्ते तुझी सत्ता । येथे सकळ अनंता ॥धृपद॥
माझीया मरणे । तुम्ही बैसविले ठाणे ॥२॥
तुका म्हणे काही । मी हे माझे येथे नाही ॥३॥

अर्थ :
देवा ज्यावेळी मी माझा जीवभाव तुला अर्पण केला त्याच वेळी मी त्याचा आश्रय सोडून दिला आहे. त्यामुळे हे अनंता आता मी येथे या भवसागरामध्ये तुझ्या सत्तेनेच वर्तत आहे. देवा देहभावच माझा राहिला नाही त्यामुळे माझ्या देहभावाला मरण आले असून त्यामुळेच तर तुम्ही माझ्या अंत:करणामध्ये तुमचे ठाणे बसविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळेच हे देवा माझ्या ठिकाणी मी आणि माझे हे काहीच राहिले नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग