किती चौघाचारे । येथे
2647.
किती चौघाचारे । येथे गोविली वेव्हारे ॥१॥
असे बांधविले गळे । होऊ न सकती निराळे ॥धृपद॥
आपले आपण । केले का नाही जतन ॥२॥
तुका म्हणे खंडदंडे । येरझारी लपती लंडे ॥३॥
अर्थ :
असे कितीतरी लोक आहेत की ते चारचौघांमध्ये लौकिकाच्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत. अशा प्रकारे या लोकांनी आपल्याला लौकिकाच्या व्यवहाराने बांधून घेतले आहेत ते त्यापासून वेगळे होऊच शकत नाही. या लोकांनी आपल्या स्वत:च्या हिताचेच जतन का केले नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, यमाच्या दंडापासून आणि जन्ममरणाच्या येरझाऱ्यापासून हे लबाड लोक लपत आहेत.
