पांडुरंगा सारीखा सां
2648.
पांडुरंगा सारीखा सांडुनि वेव्हारा । आणिकाची करा आस वाया ॥१॥
बहुता दिधला उद्धार उदारे । निवडीना खरे खोटे काही ॥धृपद॥
याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥
तुका म्हणे माझे हातीचे वजन । यासी बोल कोण ठेवू सके ॥३॥
अर्थ :
पाडूरंगासारखा मोठा सावकार सोडून तुम्ही इतर व्यर्थ कोणाची आशा का धरता ? त्याला शरण आलेल्या भक्तांचा त्याने उदारपणे उध्दार केला ते खरे आहे की खोटे आहे याचा देखील त्याने निवाडा केला नाही. याला अंकीत असलेले शरण आलेले भक्तांचे बंदर म्हणजे वैकुंठ आहे तेथे दुसरा कोणताही व्यवहार चालतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही तुम्हाला सांगत आहे तो माझा स्वत:चा अनुभव आहे आणि मी जे काही बोलतो आहे याचे वजन मी माझ्या हाताने केले आहे व माझ्या बोलण्याला कुणी नांव ठेवू शकेल काय ?
