वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आजिवरी होतो तुझे सत्

🙏 3. संत तुकाराम · ABH-077141 · अभंग क्र. २६३०

2630.
आजिवरी होतो तुझे सत्ते खाली । तोवरी त्वा केली विटंबणा ॥१॥
आता तुज राहो नेदी या देशांत । ऐसा म्या समर्थ केला धणी ॥धृपद॥
सापे रिग केला कोठे बाळपणी । होतीसी पापिणी काय जाणो ॥२॥
तुका म्हणे म्या हा बुडविला वेव्हार । तुझेचि ढोपर सोलावया ॥३॥

अर्थ :
हे लज्जे आजपर्यंत मी तुझ्या सत्तेखाली होतो तोपर्यंत तू माझी खूप विटंबना केली आहे. परंतू आता मी माझ्या देहरुपी देशामध्ये तुला राहूच देणार नाही असा सर्व समर्थ धनी मी केला आहे. हे लज्जे बाळपणी तुझ्यामध्ये सापाने प्रवेश केला आहे त्यामुळे तू एवढी पापीनी आहे की काय काय माहिती ? तुकाराम महाराज म्हणतात, हे लज्जे तुझे ढोपर सोलण्याकरताच हे बघ मी माझे सर्व लोकलज्जेचे व्यवहार बुडविले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग