वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 96. गोसावी - अभंग २६५५ ते २६६०

संसाराचा धाक घेऊनिया

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084227 · अभंग क्र. २६६०

2660.
संसाराचा धाक घेऊनियां पोटी । जाहला हटतटी गोसावी तो ॥१॥
पहिल्या परीस यातायाती मागे । शिणला उद्योगें भाक मागूं ॥२॥
उठोनिया पहाटें अलख मागावे । परतोनी यावेअं झोपडीसी ॥३॥
नाही तेथे कोणी दिसे केविलवाणा । मग म्हणे नारायणा व्यर्थ जिणें ॥४॥
जरी असतो घरबारी स्त्री पुत्र असती । आता ही फजीती नको देवा ॥५॥
टाकूनिया वेष स्त्री करु धांवे । तो आयुष्याचें हावेंक ग्रासियेला ॥६॥
राहिली वासना संसार करणे । एका जनार्दनी म्हणती जन्म घेती ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग