येवढा मंत्र सोपा सां
2625.
येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासी । का रे प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥
वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वाया ॥२॥
वृंदावनाचे परी वर वर रेखा । तैसे पढतमूर्खा वेद गोष्टी ॥३॥
एका जनार्दनी प्रपंच टाकुनीं । परमार्थ साधनी रिघे वहिला ॥४॥
