वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

खोल ओली पडे ते पीक उ

🙏 3. संत तुकाराम · ABH-076960 · अभंग क्र. २६५७

2657.
खोल ओली पडे ते पीक उत्तम । उथळाचा श्रम वाया जाय ॥१॥
लटिक्याचे आम्ही नव्हो सांटेकरी । थीते घाली भरी पदरीचे ॥धृपद॥
कोणा इहलोकी पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥
तुका म्हणे कसी अगी जे उतरे । तेचि येथे सरे जातिशुद्ध ॥३॥

अर्थ :
बी खोलवर आणि जेथे ओलावा असेल तेथे पेरले तर त्याचे पीक उत्तम प्रकारे येते नाहीतर बी पेरले आणि तेथे पाण्याचा प्रवाह जास्त असेल उतार असेल तर तेथे काहीही श्रम केले तर ते वाया जाते. आम्ही खोटयाचे साथीदार नाहीत कारण जो खोटा आहे तो त्याचे पदरचे सर्व खोटे आपल्या पदरात घालत असतो. या इहलोकामध्ये परमार्थाचा खोटा पसारा कोणाला पाहिजे आहे आणि खोटा परमार्थ दाखवण्याचे सोंग म्हणजेच दंभ होय त्याची आवड तरी कोणाला आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, जे सोने अग्नीमध्ये घातल्यावर पूर्णपणे कसाला उतरुन चांगले बाहेर येते तेच शुध्द जातीचे खरे सोने ठरते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग