अनुतापयुक्त गेलिया अ
2656.
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरू वचन मागिलांचा ॥१॥
त्याचे पाय माझे लागोत कपाळी । भोगे उष्टावळी धन्यकाळ ॥धृपद॥
षडउर्मी जिंही हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगी ॥२॥
तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीचि अंतरी शुद्ध होती ॥३॥
अर्थ :
ज्याच्या ठिकाणी पश्चात्ताप उत्पन्न होऊन जो देहाविषयी अभिमान विसरुन गेला त्याचे सर्व मागील पापी शब्द आम्ही विसरुन जाऊ. त्याचे पाय माझ्या कपाळाला लागोत त्याचे उष्टे ज्यावेळी सेवन करण्याचा योग येईल तो काळ धन्य होय. षडऊर्मींना जे लाथा मारतात आणि संतांना जे शरण जातात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांचे अंत:करणात शुध्द असते तेच संतांच्या संगतीने लवकर परमार्थाकडे वळतात.
