झाला हा डांगोरा । मु
2646.
झाला हा डांगोरा । मुखी लहानही थोरा ॥१॥
नागविलो जनाचारी । कोणी बैसो नेदी दारी ॥धृपद॥
संचिताचा ठेवा । आता आला तैसा घ्यावा ॥२॥
तुका म्हणे देवे । केले आता हे बरवे ॥३॥
अर्थ :
लहान व थोर यांच्या मुखातून अशी दवंडी पिटवली जात आहे की, देवाने मला जनमाणसामध्ये नागवे केले आहे आणि कोणीही मला दारात देखील बसू देत नाही. देवा अरे माझे संचित कर्म असेल तसेच मला भोग भोगावे लागतील यामध्ये तुझा काय दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उलट देवाने जे केले आहे ते चांगलेच केले आहे.
