नेले सळेंबळे । चित्त
2645.
नेले सळेंबळे । चित्तावित्ताचे गांठोळे ॥१॥
साह्य झाली घरिच्या घरी । होता ठायींच कुठोरी ॥धृपद॥
मी पातलो या भावा । कपट ते नेणे देवा ॥२॥
तुका म्हणे उघडे केले । माझे माझ्या हाते नेले ॥३॥
अर्थ :
अहो देवाने बळजबरी करून माझे चित्तरूपी गाठोडे नेले आहे. अहो देव माझ्या देहरूपी घरांमध्ये हृदयाच्या कोपऱ्यात लपून बसला होता आणि माझ्या घरच्या म्हणजे इंद्रिय रुपी सर्व स्वजनांनी त्याला सहाय्य केले आणि मग देवाने माझ्या घरात चोरी केली. देवा मी तुमच्यावर खरा भक्तिभाव ठेवला व या संसारात आलो परंतु तुमचे कपट मला माहीतच नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात देव तू माझ्या हातातले सर्व काही नेले म्हणजे चित्तरुपी गाठोडे घेऊन गेला आणि मला उघडे पाडले.
