वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

कळो आले तुझे जिणे ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077369 · अभंग क्र. २६२८

2628.
कळो आले तुझे जिणे । देवा तू माझे पोसणे ॥१॥
वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईची ॥धृपद॥
बोलाविता यावे रूपा । सदा निर्गुणीचि लपा ॥२॥
तुका म्हणे तू परदेशी । येथे आम्हा अंगे जिसी ॥३॥

अर्थ :
देवा तुझे जगणे कसे आहे ते मला कळून आले आहे ते म्हणजे असे की तुला मी पोसणारा आहे. देवा तू सतत आमची वाट पाहात असतोस मग तुला सतत निर्गुणात राहण्याची सत्ता तरी कोठे आहे ? देवा तुला आम्ही बोलविले की तू लगेच नामरुपाला येतोस नाहीतर तू नेहमी निर्गुण स्वरुपातच लपलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू तर निर्गुण परदेशी आहेस परंतू आम्ही तुला बोलविले की तू लगेच सगुण होतोस आणि येथे आमच्यामुळेच तू जगतोस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग