वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

न धरी प्रतिष्ठा कोणा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077251 · अभंग क्र. २६२५

2625.
न धरी प्रतिष्ठा कोणाचीहि यम । म्हणता का रे राम लाजा झणी ॥१॥
सापडे हातीचे सोडवील काळा । तो का वेळोवेळा नये वाचे ॥धृपद॥
कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥
तुका म्हणे हित तो म्हणा विठ्ठल । न म्हणेल तो भोगील कळेल ते ॥३॥

अर्थ :
यमाकडे कुणीही गेले तर यम त्याची प्रतिष्ठा किंवा त्याची वाहवा करीत नाही त्यामुळे राम हे नाम घेताना तुम्ही लाज का धरता. जे रामनाम तुम्ही काळाच्या हातात जरी सापडलात तरी तुम्हाला सोडवते ते नाम तुमच्या वाचेत का येत नाहीत. स्वत:च्या सामर्थ्यावर स्वत:च्या शक्तीने या त्रैलोक्यामध्ये असा कोणता एक मनुष्य आहे की जो काळाच्या हातून सुटला असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी रामाचे नाम घेतले नाही त्यामुळे घोर अशा कुंभपाक व रौरव नावाच्या नरकात गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आपले हित व्हावे त्यासाठी विठ्ठल विठ्ठल असे म्हणत राहा आणि जो म्हणणार नाही त्याला पुढे नरक भोगण्याची वेळ आली मग त्याला होणारा त्रास पुढे कळेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग